वाहतुकीचे साधन: ट्रेन आणि बस
दुर्ग रामशेज इतिहास
सह्याद्री पर्वतरांगातील एका खडकाळ टेकडीच्या माथ्यावर बांधलेल्या रामशेज किल्ल्याचा इतिहास प्राचीन काळापासून आहे. मूळतः यादवांनी बांधलेला हा किल्ला नंतर विविध राजवंशांच्या ताब्यात गेला, प्रत्येक राजवंशाने त्याच्या स्थापत्य वैभवावर आपली छाप सोडली.
नाशिकच्या उत्तरेला असलेल्या सह्याद्रीतील दुर्मिळ आणि आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे रामशेज. रामशेज म्हणजे भगवान रामाचे शयनगृह . वनवासात असताना, भगवान राम यांनी काही काळासाठी या ठिकाणी आपले निवासस्थान बनवले होते, ज्यामुळे या किल्ल्याला हे नाव मिळाले.
सार्वजनिक वाहतुकीने कसे पोहोचायचे
- मुंबईच्या सीएसएमटी आणि पुण्याहून नाशिकला अनेक गाड्या आहेत.
- रामशेजसाठी नाशिक हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
- नाशिकरोड बस डेपोहून नाशिकच्या (जुन्या) ओल्ड सीबीएस बस डेपो करीत प्रत्येकी ३० मिनिटाला बसेस आहेत.
- नाशिक (जुन्या) ओल्ड सीबीएस बस डेपोहून पेठ मार्गाची बस पकडा आणि आशेवाडी येथे उतरा. --किंवा
- निपाणीहून शेअरिंग टॅक्सी उपलब्ध आहेत. --किंवा
- नाशिकरोडवरून ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत, पण त्याकरिता जास्तीचे भाडे द्यावे लागते.
प्रवास आणि ट्रेकिंगचा अनुभव
हरिहर किल्ल्याला भेट देण्याचा प्लॅन होता, पण काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही हरिहर किल्ल्याचा प्लॅन रद्द केला आणि रामशेज किल्ल्याला भेट देण्याचा निर्णय घेतला. प्राचीन भारतात तसेच मराठा साम्राज्यातही या किल्ल्याचा मोठा इतिहास आहे.
मी आणि माझा मित्र विजय सुतार, भटकंती - ध्यास गडकिल्ल्यांचा नावाच्या ट्रेकिंग ग्रुपचा मालक, ठाणे रेल्वे स्थानकात भेटलो. शेवटच्या क्षणी योजना बदलल्यामुळे, नाशिकला पोहोचण्यासाठी दुसरा कोणताही जलद पर्याय नसल्याने आम्ही जनरल डब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आम्ही रात्री १२:५० वाजता महानगरी एक्सप्रेसमध्ये चढलो आणि पहाटे ४:०० वाजता नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर उतरलो.
आम्ही पश्चिमेकडे नाशिक बस डेपोसाठी निघालो आणि पेठ रोड मार्गे रामशेज किल्ल्याला जाणाऱ्या बसबद्दल विचारपूस केली. नाशिक रोड बस डेपोवरून थेट बस नाही; म्हणून, आम्ही नाशिक ओल्ड सीबीडी डेपोसाठी बस पकडली. बस सकाळी ५:०० वाजता निघाली आणि सुमारे ५:२० वाजता जुन्या सीबीडी बस डेपोत पोहचलो. चौकशी कक्षात आम्ही पेठ मार्गावरून जाणारी बस विचारली; बस सकाळी ५:३० वाजता येईल. आम्ही १० मिनिटे वाट पाहिली आणि सकाळी ५:३० वाजता पेठ मार्गाने जाणाऱ्या एस.टी बसमध्ये चढलो आणि सकाळी ६:३० वाजता रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्याआशेवाडी बस स्टॉपवर उतरलो .

आम्ही पेठ महामार्ग ओलांडला आणि रामशेजच्या दिशेने जाणारा रस्ता धरला. १५-२० मिनिटे चालल्यानंतर आम्ही पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचलो, गावात आम्हाला एक फलक दिसला, फलकावरील रामशेज किल्याचा इतिहास वाचाल आणि किल्याच्या दिशेने निघालो. डोंगर चढत असते वेळी सूर्यनारायणाचे दर्शन झाले सूर्योदय कॅमेऱ्यात टिपला आणि पुढे निघालो. एक तास चढाई केल्यानंतर, आम्ही गुंफेतील असणाऱ्या भगवान श्री राम यांच्या मंदिरात पोहोचलो, गुंफेत काही वेळ घालवला आणि पुढे निघालो. गुंफेच्या खालच्या बाजूस पाण्याचे टाके आहे, टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. २-३ मिनिटांत आम्ही महादरवाजा दरवाजा जवळ पोहोचलो, जिथे आम्हाला एक मोहक दृश्य पाहायला मिळाले, थंड वारा आणि डोंगरावरून वाहणारे पावसाळी ढग पाहून, आमचा थकवा दूर झाला. आम्ही पावसाळी ढगांचा खेळ पाहण्यात काही वेळ घालवला.
काही पर्यटक दगडी कमानीखालून खाली जाताना दिसले, तिथे काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पुढे गेलो. दगडी पायऱ्या उतरून खाली पोहोचलो आणि आणखी एका गुहे जवळ येऊन थांबलो. नकाशा तपासला तेव्हा ती जागा शस्त्रागार किंवा दारूगोळ्याची कोठार असल्याचे समजले. शस्त्रागार पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा वर आलो आणि गडाच्या उत्तरेकडे निघालो. तटबंदीच्या कडेने असलेल्या पायवाटेने चालत आम्ही प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. अलीकडेच एका अज्ञात दुर्ग संवर्धन गटाने प्रवेशद्वारावर दरवाजा बसवला आहे. आत शिरलो आणि एका गुप्त मार्गापाशी पोहोचलो. विजयने सांगितले की, पायऱ्या उतरून खाली गेल्यास शिवलिंगाचे दर्शन होते. आम्ही दोघेही पायऱ्या उतरलो, काही अंतर पुढे गेल्यावर पायऱ्या संपल्या. जमिनीतील एका छिद्रातून खाली पाहिल्यावर गुहेतील शिवलिंग दिसले.
आम्ही ज्या दरवाजातून गेलो त्याचे नाव "गोमुखी द्वार " आहे , जो हातोडा आणि छिन्नी वापरून एकाच दगडात कोरलेला होता. त्याच मार्गाने महादरवाज्याकडे आलो. तिथून थोडासा यू-टर्न घेत पुढे गेलो. चुन्याच्या घाण्याचे अवशेष दिसले, चुना पाळण्याचे चाक नव्हते पण जमिनीत कोरलेले रिंगण मात्र सुस्तिथित आहे. २०-२५ पायऱ्या चढल्यानंतर आम्ही पाण्याच्या टाक्यांजवळ पोहोचलो. टाक्यांची साखळी अशा प्रकारे बनवली आहे की, टाकीतील अतिरिक्त पाणी खालच्या बाजूस असलेल्या टाकीत जमा होते व गाळही साफ होतो. प्राचीन वास्तुविशारदांना सलाम!
आम्ही पुढे गेलो, एका लहान टेकडीवर चढलो आणि देवी भवानी मंदिरात पोहोचलो . मंदिराजवळच गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आहे. आम्ही काही फोटो आणि व्हिडिओ काढले आणि चोर खिंड (गुप्त दरवाजा) शोधण्यासाठी डावीकडे वळलो. शोध घेत असताना आम्हाला किल्लेदाराच्या वाड्याचे उध्वस्त अवशेष आणि काही पाण्याची टाक्या दिसल्या; पाण्याच्या टाक्यांजवळ आम्हाला एक लहान प्रवेशद्वारासारखी रचना आढळली, हाच तो गुप्त दरवाजा, ज्याचा आम्ही शोध घेत होतो. मुघलांनी ५-६ वर्षे गडाला वेढा घातला होता. तेव्हा गडावर रसद पोहचवण्या करीत ह्याच गुप्त मार्गाचा वार्पर केला असावा.
गुप्त दरवाज्याच्या आत शिरलो आणि गडाच्या बाहेरील बाजूस आलो, पुढे घळ असल्या कारणाने तिथेच थांबलो. उभे राहायला फार कमी जागा असल्याकारणाने, सावधगिरी बाळगावी लागत होती. या जागेतून दिसणारे विहंगम दृश्य अप्रतिम होते, इथून इतर गड कोटही दिसत होते. आम्ही थोडा वेळ तिथेच विश्रांती केली आणि इतिहासावर चर्चा करत आणलेला खाऊ खाल्ला. मुघल सेनापती शहाबुद्दीन खानने औरंगजेबला आश्वासन दिले होते की, तो एका आठवड्यात रामशेज किल्ला जिंकेल, परंतु तो पूर्णपणे अपयशी ठरला. मराठा सैन्य आणि गडाचा सेनापती ५ ते ६ वर्षे शौर्याने लढले. दुर्दैवाने म्हणजे, या सेनापतीचे नाव अजूनही अज्ञात आहे.
आम्ही माघारी फिरत, गुप्त दरवाजातून बाहेर पडलो आणि गडाच्या सर्वोच्य माथ्यावर पोहचलो, जिथे आम्हाला पुन्हा पाण्याच्या टाक्यांची साखळी दिसली, ह्याही टाक्या उतारावर एका खालोखाल बांधल्या होत्या. जेणेकरून वरच्या टाक्यातील अतिरिक्त पाणी खालच्या टाकीत जमा होईल. गडावर भरपूर प्रमाणात पाण्याचे टाके खोदलेले आहेत, जेणेकरून वर्षभराकरिता पाणी साठा तयार होत असे. गडाचा सर्वोच्य माथा (बाले किल्ला) पाहून झाल्यावर, आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली आणि पुन्हा महादरवाज्याजवळ पोहोचलो.
![]() |
| मंदिरातील भवानी देवीची मूर्ती |
![]() |
| पाण्याच्या टाक्या |
गडाच्या उत्तरेकडील भाग पाहून झाला होता, आम्ही आता गडाच्या दक्षिण भाग पाहण्याकरिता निघालो, दक्षिण दिशेस एक पठार आहे जिथे काही पाण्याच्या टाक्या आणि कातळावरील शाम्यानाच्या जुन्या खुणा वगळता कोणत्याही प्राचीन वास्तू पाहण्याकरिता अस्तित्वात नाही. अवघ्या तासाभरात आमचा गड पाहून झाला होता. परतीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आम्ही लिंबाचा रस पिऊन गड उतरायला सुरुवात केली. सकाळी ९:०० वाजता आम्ही पायथ्याशी असलेल्या आशेवाडी गावात पोहोचलो.
आम्ही एस.टी बस करीत पेठ रोडच्या दिशेने निघालो, रस्त्याच्या कडेला एक रेस्टऑरेंत दिसले, म्हणून आम्ही नाश्ता करण्याचा निर्णय घेतला. आम्ही बटाटा वडा उसळ आणि पाव मागवला. उसळ खूप झंजाणित तिखट होती, पहिल्याच घासला ठसका लागला. आम्ही दोघेही कोकणी, त्यामुळे इतके तिखट पदार्थ खायायची आम्हाला सवय नाही. पाव परत केले आणि फक्त बटाटा वाडा खाल्ला. टीप: नाशिकमध्ये, तुम्हाला गावांमध्ये झणझणी तिखट जेवण मिळेल; जर तुम्हाला त्याची सवय नसेल, तर पर्याय म्हणून पंचवटी किंवा नाशिक रोड सारख्या पर्यटन स्थळी इडली आणि मेदुवाडा सारख्या दक्षिण भारतीय पदार्थ मिळतील. नाश्ता करून झाल्यावर, आम्ही पेठ रोडच्या कडेला उभार राहून एस.टी बशी वाट पाहत उभे राहिलो. जवळजवळ ३०-४५ मिनिटे एस.टी बसची वाट पाहिली, पण बस काही आली नाही, अखेरीस आम्हाला एक शेयर टॅक्सी मिळाली जिच्यानी आम्ही निपाणी येथे पोहचलो, प्रत्येकी ७० रुपये झाले. निपाणी बस डेपोमधून आम्ही बसमध्ये चढलो आणि नाशिकरोडला पोहोचलो. ट्रेनचे आरक्षण नसल्याने आम्ही पुन्हा जनरल डब्याचे तिकीट काढले आणि छपरा एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढलो. छापरा एक्सप्रेस पकडून खूप मोठी चूक केल्याचे जाणवले. डब्यातील गालिच्या प्रवासी आणि दुर्गंधी इतकी होती कि केव्हा एकदा गाडी मुंबईला पोहचते आणि गाडीतून उतरतो असे झाले होते. मी दादर स्थानक पर्यंत थांबलोच नाही, विजय सोबत ठाणे स्थानकात उतरलो आणि लोकल ट्रेन ने दादरला गेलो. आयुष्यात पुन्हा कधी छपरा एक्सप्रेस मध्ये चढणार नाही भले उशीर झाला तरी चालेल.

छपरा एक्सप्रेस वगळता, पूर्ण ट्रेक व प्रवास मस्त झाला. आता आम्हाला धोडप खुणावत आहे, पाहूया कधी योग येतो धोडप गड पाहण्याचा.
खर्चाचा तपशील (जेवण व नाश्ता वगळून)
वेळेचा तपशील
जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे
भोरगड किल्ला
देहेगड किल्ला
अंजनेरी किल्ला
पंचवटी
देहेगड किल्ला
अंजनेरी किल्ला
पंचवटी
सप्तशृंगी शक्तीपीठ आणि गड
त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आणि गड
![]() |
| भगवान राम मंदिराखालील पाण्याची टाकी |
.jpg)

.jpg)