प्रवासाची तारीख : २ आणि ३ मार्च २०२४
मित्रांनी घातलेला गोंधळ आणि प्रवासवर्णन
तारे, ग्रह हा काही ट्रेकिंगचा विषय नाही, पण जंगलात रात्रीच्या वेळेस वाट चुकल्यास तार्यांची मदद, योग्य दिशा शोधण्यात कशी घावी, ही एक महत्वाची माहिती तुम्हा सर्वांना सांगावी; तसेच तारे निरीक्षणाचा मला मिळालेला अविस्मरणीय अनुभव तुम्हाला सर्वांना सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न. एकविसाव्या शतका तरुण, बालक, वृद्ध, सर्वच वयोगटातील लोकांना सामाजिक माध्यमे (सोशिएल मीडियाचे) वेड लागले आहे. या सर्वांबरोबर मलाही याचे वेड लागले आहे, इंस्टाग्राम वर रील्सची झुकझुक गाडी पुढे सरकवत असताना, तारे निरीक्षणाची (स्टार गेझिंग) ची पोस्ट समोर आली, फोटो मध्ये मोठमोठ्या दुर्बिणी दाखवल्या होत्या ते पाहून उत्सुकता अजून वाढली, एक वेगळा अनुभव घ्यावा आणि तार्यांबद्दल माहिती मिळावी म्हणून, दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल केला, मिहीर गिलबिले यांनी कॉल उचलला त्यांच्याशी बोलणे झाले सुरवातीला मिहीर हे स्वयंसेवक म्हणून "होराइझन ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी" या संस्थेत काम करत असावे असे वाटले, पण त्यांच्याशी गप्पा मारताना कळले की ते स्वतःच या संस्थेचे मालक आहेत, बोलकी आणि मनमोकळी स्वभावाची व्यक्ती! त्यांने दिलेल्या माहिती प्रमाणे डॉर्मेटरी मध्ये राहायचे असल्यास १५०० रुपये तर टेन्ट मध्ये राहायचे असल्यास २००० रुपये प्रति व्यक्ती शुल्क आकारले जाते. या शुल्कात सायंकाळची न्ह्यारी, रात्री चे जेवण व दुसऱ्या दिवशी सकाळच्या न्ह्यारीचा समाविष्ट आहे. दिलेले शुल्क विषयी माहिती फेब्रुवारी २०२४ ची आहेत, याची नोंद असावी.
 |
| दुर्बिणीद्वारे तारे निरीक्षण |
हा आगळा वेगळा अनुभव आणि माहिती फक्त आपणच न घेता, आपल्या मित्रांना पण मिळावी म्हणून सर्व मित्रांना विचारले, पण नेमहमि येणारेच तीन मित्र तयार झाले विनायक, कौशल आणि अमेय, त्यातही विनायकचे नक्की नव्हते, म्हणून कौशल, अमेय आणि माझी बुकिंग केली. बुकिंग करून दोनच दिवस उलटले होते, आणि कौशलचा फोने आला त्याचे पहिले वाक्य होते "मी माती खाल्ली!" हे एकूण मी समजलो ह्याचे येणे रद्द होत आहे. कौशलने २ मार्च रविवारची सुट्टी घेण्या ऐवजी २४ फेब्रुवारी रविवारची सुट्टी घेतली होती, आता पुन्हा सुट्टी मिळणे अशक्य होते. मित्र ह्या नात्याने दोन चार शब्द ऐकवले आणि बुकिंग रद्द करण्या करीत मिहीरला कॉल केला. एक चांगले होते कि कौशल ने लवकर कळवले होते, ७ दिवस आधी बुकिंग रद्द केल्यास पूर्ण रक्कम परत मिळणार होती, पण २ मार्चचा कार्यक्रम झाल्या नंतर, म्हणून बुकिंग विनायकाच्या नावावर हस्तांतरित करता येईल का विचारले. मिहीरने एक मेल आयडी दिला आणि त्यावर बुकिंग आयडी आणि विनायकाचा तपशील पाठवायला सांगितले. विनायकला पुन्हा एकदा फोन करून सुनिश्चित केले आणि बुकिंग हस्तांतरित करण्या करीत मेल पाठवला. एक दिवस आधी, म्हणजे १ मार्चला कौशलचे बुकिंग विनायकाच्या नावावर हस्तांतरित केल्याचे मिहीरने मेल द्वारे पुष्टी केली.
२ मार्चची पूर्ण रात्र जागायची होती, म्हणून २ आणि ३ मार्च अशी दोन दिवस सुट्टी घेतली होती (शनिवार रविवार की छुट्टी सबको नाही मिलती लक्षमण!). मिहीर ने दिलेल्या माहितीनुसार आम्हाला
दुपारी ३:३५ ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुन सुटणारी कर्जत जलद लोकल पकडायची होती, पण थोडे लवकर जाऊन तेथील ऍग्रो फार्मिंग विषयी माहिती मिळवू म्हणून ३:१० ची खोपोली जलद लोकल पदकड्याची असे ठरविले. मी सुमारे दुपारी १:०० च्या दरम्यान घरातून निघालो, पण ट्राफिक जॅम मुळे, गोरेगाव स्टेशनला उशिराने पोहचलो आणि समोरून दादरला जाणारी ट्रेन निघून गेली, यामुळे सी.एस.एम.टी हुन दादरला येणारी, खोपोली फास्ट ट्रेन चुकली. आता मिहीर ने दिलेल्या माहित नुसार, ३:३५ ची कर्जत फास्ट पकडायची, असे विनायक आणि अमेयला कळवले. कारण अमेय ठाणेहून तर विनायक डोंबिवलीहून ट्रेन पकडणार होता. मी दादरहून कर्जत जलद लोकल पकडली, तसेच अमेय ठाण्याहून ट्रेन मध्ये चडला, पण विनायकला मात्र डोंबिवली स्टेशनला पोहचायला उशीर झाला आणि ट्रेन चुकली. अमेय आणि मी सायंकाळी ५:१२ ला वांगणी स्टेशनला पोहचलो. विनायक कडे एकच पर्याय होता तो म्हणजे मागणं येणारी ५:२५ ची कर्जत जलद लोकल. तासभर स्टेशनला वाट पाहत बसण्यापेक्षा आम्ही पुढे जातो असे विनायकला कळवले आणि आम्ही दोघे वांगणी पश्चिमेला स्टेशन बाहेर आलो. जवळील एका दुकानात शेयर रिक्षा स्टँडची चौकशी केली, दुकानदाराने सांगितल्या प्रमाणे आम्ही चालत पुढे जाताच होतो इतक्यात एक रिक्षा जवळच येऊन थांबली. आम्ही त्याला डोणे गावात जायचे आहे असे सांगितले असता त्यानं ६० रुपय होतील असे सांगितले.
शेयर रिक्षाने गेलात तर मानसी १५ रुपये होतात, पण सीट पूर्ण भारे पर्यंत वाट पाहावी लागते, वेळ वाचवण्या साठी आम्ही शेर रिक्षा न करता,
६० रुपये देऊन डोणे गावातील ग्रामपंचायत जवळ उतरलो. समोरच बोर्ड दिसला "मोरे निसर्ग कृषी पर्यटन", बोर्ड वर दिलेल्या बाणाच्या दिशेने आत जात आम्ही फार्म हाऊस मध्ये पोहचलो. तिथे मिहीर गिलबिलेला भेटलो आणि कळाले कि सूर्यास्त उशिराने होणार असल्या कारणाने तारे निरीक्षणाचा कार्यक्रम उशिराने म्हणजे सायंकाळी ७:०० च्या सुमारास चालू होणार आहे. मी लगेच विनायकला ही बातमी कळवली आणि सांगितले की आरामात ये घाई करू नकोस. मिहीर आम्हाला डॉर्मेटरी कडे घेऊन गेला, बराच वेळ होता म्हणून मिहीर ने आम्हाला फार्महाउस मध्ये लावलेली फुल झाडे वर इतर परिसर पाहायला सांगितले व ६:०० वाजता न्ह्यारी साठी कॅन्टीन मध्ये हजार राहायला सांगितले. मी आणि अमेय दोघे फुल बाग पाहत पूर्ण परिसर फिरलो आणि ६:०० वाजता न्ह्यारी साठी कॅन्टीन मध्ये पोहचलो. कांदेपोहे आणि चहा घेतला आणि डॉर्मेटरी मध्ये आराम करायला गेलो. ६:३० वाजे पर्यंत विनायक पण पोहचला होता, त्याने पण न्ह्यारी केली आणि आम्ही तिघे मैदानात तारे निरीक्षणासाठी पोहचलो.
तारे निरीक्षण अनुभव!
मिहीर ने आम्हाला दुर्बीण आणण्यासाठी, त्याला मदत करा अशी विनंती केली. आम्ही तिघांनी जाऊन दुर्बिणीचे अवशेष आणले आणि ते जोडण्यास मिहीरला मदद केली त्याच बरोबर दुर्बिणीविषयी त्याच्याकडून माहिती करून घेतली. तिथे एक दुर्बीण सदृश वस्तू होती, ती हातात घेऊन आम्ही ग्रह पाहण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही दिसत नव्हते! मिहीर ने सांगितले की ती छोटी दुर्बीण आहे त्यातनं कोणतेच ग्रह दिसणार नाही, त्याचा उपगोत स्पॉटर / फाइंडर स्कोप म्हणू केला जातो. बराच अंधार झाला होता, तारे निरीक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती झाली होती. लहान मोठी अशी सर्व पकडून १७ जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्वप्रथम मिहीरने सर्वांना काही महत्वाच्या सूचना दिल्या त्या म्हणजे, मोबाईल फोनचा कमी वापर करणे किव्हा डिस्पले लाईट कमी करणे, जेणे करून उघड्या डोळ्यांनी तारे स्पष्ट दिसतील. जेव्हा डोळ्यांच्या बाहुलीवर प्रकाश पडतो तेव्हा ती आकसते आणि त्यामुळे तारे पाहण्यात अडचण नार्मन होते किव्हा, स्पष्ट दिसत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुमुद्री डाकू / चाचे यांच्या एका डोळ्यावर बांधलेली पट्टी, आतापर्यंत हाच समज होता की, डोळा बाध झाल्यावर चाचे त्या डोळ्यावर पट्टी बांधत असतील; पण तसे नसून, पट्टी बांधलेला डोळा रात्रीच्या वेळेस दूरवर स्पष्ट पाहण्यात मदत करतो, कारण त्याला दिवसभर सूर्य प्रकाश न मिळाल्या मुळे डोळ्याची बाहुली आकसलेली नसते. तारे निरीक्षण करताना प्रकाश प्रदूषण नसणे, म्हणजेच सर्वबाजूला अंधार असणे आवश्यक असते हे प्रमुख्याने लक्षात येते.
सर्व प्रथम मिहीरने एका ताऱ्या कडे बोट दाखवत सांगितले की, हा लक्ख चमकणारा तारा, तारा नसून गुरु ग्रह आहे. हे एकूण आम्हाला आश्चर्यच वाटले, मिहीरने आम्हाला दुर्बिणीतून गुरु ग्रह व त्याचे चंद्र दाखवले आणि नंतर दुर्बिणीचा फोकस आणखी वाढऊन गुरु ग्रहावरील वातावरणाची चादर दाखवली.
 |
चित्र १. गुरु ग्रह आणि त्याचे चंद्र. (स्रोत: टॉम ली - इंटरनेट). चित्र २. गुरु ग्रह आणि त्यावरील वातारवर्णाची चादर (स्रोत: पीटर हेमन - इंटरनेट). |
सर्वांचे गुरु ग्रह पाहून झाल्या वर मिहिरेने लेझर लाईट द्वारे मेष आणि वृषभ नक्षत्र दाखवले. त्यानंतर ग्रीक आणि भारतीय नक्षत्र पद्धती बद्दल माहिती दिली तसेच पुढे ओरियन हंटर आणि ओरियन बेल्ट लेझर लाइटी द्वारे दाखवले. नक्षत्रांविषयी चर्चा करून झाल्यावर, टेलिस्कोप च्या साह्याने ओरियन नेब्युला दाखवला, गडद गुलाबी रंगाचे दृश्य इतके सुंदर होते की जणू अवकाशात गुलाबच उमलले आहे.
 |
ओरियन नेब्युला (स्रोत: अमेय विपत - टेलिस्कोपच्या साह्याने आय-फोने १४ ने घेतलेला फोटो) |
नेब्युला म्हणजे तारा तयार होण्या पूर्वीची प्रक्रिया, यामध्ये अनेक वायूंचा समावेश असतो व त्याच्यातील होणाऱ्या फ्युजन मुळे तार्याची निर्मिती होते. आम्हा सर्वांसाठी ही एक नवीनच माहिती होती. ओरियन नेब्युला पाहून झाल्यावर, ताऱ्यांचा समूह (क्लस्टर) व कृतिका नक्षत्र दुर्बिणी द्वारे पहिले. या नंतर अजून एक महत्वाची माहिती मिळाली ती म्हणजे, सर्वात तेजस्वी तारा हा धुरव तारा नसून सायरस तारा आहे. आतापर्यंत हाच समज होता कि ध्रुवतारा हा सर्वात तेजस्वी तारा आहे पण, याचे स्थान पहिल्या १०० तेजस्वी ताऱ्यांच्या यादीत येत नाही. सायरस तारा पृथ्वी पासून ८.६ प्रकाश वर्ष दूर आहे आणि सूर्य पेक्षा दुप्पट मोठा आहे. सायरस तारा हा दुर्बीने द्वारे पाहिला तेव्हा फक्त प्रकाशच दिसत होता, कोणताही आकार दिसत नव्हता. तारा आणि ग्रह यात फार फरक आहे, भले आपल्याला ग्रह तार्यांसारखे चमकताना दिसत असले तरी, दुर्बिणीतून पाहिल्यावर गोलाकार किव्हा एक विशिष्ट्य आकार दिसून येतो, पण तारे हे वेगवेगळ्या वायू पासून तयार झालेले असतात त्यात कोणताही धातू नसतो त्यामुळे दुर्बिणीतून पाहिल्यावर कोणताच आकार दिसत नाही फक्त चमकणारा प्रकाश दिसतो. रात्रीचे ९:00 वाजले होते, आम्ही सर्व कँटीन मध्ये जेवणासाठी पोहोचलो. शाकाहारी व मौसारी असे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध होते. जेवण उत्कृष्ट आणि चविष्ट होतेच पण त्या बरोबर दिलेले कालाजामून अप्रतिम होते. जेवण झाल्यावर डॉर्मेटरी मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि ९:५० च्या दरम्यान पुन्हा मैदानात आलो.
मोबाईल द्वारे ताऱ्यांचे फोटो कसे काढावेत, ऍस्ट्रोफोटोग्राफी कशी करावी याच्या विषयी माहिती दिली तसेच मोबाईल मधील कॅमेराची प्रो सेटिंग दाखवली, दिलेल्या माहितीचा वापर करत आम्ही सिंव्ह आणि सप्तर्षी या दोन नक्षत्रांचा फोटो काढला. सप्तर्षी नक्षत्राचा उपयोग हा दिशा जाणून घेण्या साठी होतो, सप्तर्षी नक्षत्राचा आकार हा चमचा किव्हा नाग फण्या सारखा दिसतो. चमच्याच्या किव्हा नागफणीच्या टोकावर सरळ रेष ओढली तर ध्रुव तार्याची दिशा मिळते, आणि ध्रुव तारा हा नेहमी उत्तर दिशेला असतो. इतर तारे जसे आपली दिशा बदलतात तसे ध्रुव तारा आपली दिशा बदलत नाही. सप्तर्षी नक्षत्र आपला कोन बदलत असला तरी, चमचा किव्हा नागफणीच्या समोरच ध्रुव तारा दिसणार, भले ध्रुव तारा नाही दिसला तरी उत्तर दिशा कोणती याचा अंदाज आपल्याला मिळतो. ट्रेकिंग करताना किव्हा जंगलात भ्रमंती करताना वाट चुकल्यास, रात्रीच्या वेळेस दिशा जाणून घेण्या करीत सप्तर्षी नक्षत्र किव्हा ध्रुव ताऱ्याचा उपयोग होतो. आजच्या आधुनि जमान्यात होकायंत्र किव्हा मोबाईल मध्ये होकायंत्र ऍपचा उपयोग केला जातो, पण मोबाईलची बॅटरी संपली, किव्हा होकायंत्र आणायला विसरल्या तार्यांची मदद घेऊ शकता. पावसाळ्यात मात्र याचा उपयोग होत नाही, याची नोंद घ्यावी.
 |
चित्र १ - सप्तर्षी नक्षत्र, वन प्लस मोबाइलला ने काढलेला फोटो. चित्र २ - सप्तर्षी द्वारे दिशा शोधण्याचे उदाहरण. |
ऍस्ट्रोफोटोग्राफी चालू असतानाच मिहीरला खोपोलीहून फोन आला, मिहीरची एक टीम खोपोलीला तारे निरीक्षणाचा कार्यक्रम घेत होती आणि तिथे मोठ्या प्रमाणात ढग आले होते, त्यामुळे त्यांचा तारे निरीक्षणाचा कार्यक्रम थांबला होता. मिहीरला अंदाज आला होता की वांगणीला पण ढग येणार. ऍस्टोग्राफी करून झाल्यावर प्रतीक्षा होती ती म्हणजे चंद्रोदयाची, आम्ही सर्वजण पूर्वेकडे नजर लावून बसलो होतो, तसेच "स्टार ट्रॅकर" या मोबाईल अँपच्या मदतीने चंद्राच्या स्तिथीचा अंदाज घेत होतो. सुमारे १०:३५ च्या दरम्यान चंद्रोदय झाला, मिहीरने दुर्बीण चंद्राच्या दिशेने फिरवली, चंद्र इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव अप्रतिम होता! रात्री १२:०० च्या सुमारास सर्वांसाठी चहा आला, ज्यांना ज्यांना झोप येत होती ते सर्व चहा पिउन तरतरीत झाले! मिहिरेने दुर्बीण अजून झूम केली आणि पुन्हा एकदा दुर्बिणीतू चंद्र पाहण्यास सांगितले, या वेळी चंद्रावरचे खड्डे अजून स्पष्ट दिसू लागले, तसेच चंद्राचे पृथ्वी भोवती प्रदक्षिणा करतानाचे त्याचे पुढे सरकणे दुर्बिणीतून स्पष्ट दिसत होते! सर्वांचे दुर्बिणीद्वारे चंद्र पाहून झाला होता, चंद्राच्या प्रकाशामुळे बरेचशे तारे दिसणे बंद झाले होते. तारे निरीक्षण करत असताना, अचानक एका सदस्याचे लक्ष तारा सदृश्य टीमटिमणाऱ्या वस्तूकडे गेले, जी वेगाने पुढे सरकत होती, त्याने विचारले असता मिहीरने सांगितले की तो तारा किव्हा विमान नसुन, एक सॅटेलाईट आहे, आणि त्याचे सोलर पॅनेल्स चमकत आहेत. सुमारे रात्री २:३० च्या दरम्यान मिहीरने तारे निरीक्षण थांबवले आणि सर्वाना आप आपल्या टेन्ट मध्ये जाऊन आराम करायला सांगितले व सकाळी ५:३० वाजत मैदानात हजर राहायला सांगितले. विनायक, मी आणि अमेय आम्ही तिघे डॉर्मेटरी मध्ये जाऊन आराम केला, पण झोपलो नाही, कारण झोपल्यास पहाटे उठायला होणार नाही.
आम्ही तिघे सकाळी ५:२० च्या दरम्यान मैदानात पोहचलो. आम्ही मिहीरला कॉल केला तेव्हा तो कँटीन मध्ये होता, तो ही ५:३० पर्यंत मैदानात पोहचला. सर्वप्रथम मिहीरने सायग्नस नक्षत्र लेझर लाईट द्वारे दाखविले आणि त्याच नक्षत्रातील एक तारा अल्बेरिओ हा दुर्बीने द्वारे दाखवला. मिहीरचा अंदाज खरा ठरला होता, जसे ढग खोपोलीत आले होते तसे आता वांगणीतही दिसूलागले. मिहीरने थोडी घाई करत आर्कटर्स हा तारा सुद्धा दुर्बीने द्वारे दाखवला. आर्कटुरस पृथ्वीपासून सुमारे ३७ प्रकाश-वर्षे दूर आढळू येतो आणि रात्रीच्या आकाशातील चौथा तेजस्वी तारा आहे. आर्कटर्स तारा हा सूर्या हुन २५ पट मोठा आहे आणि ह्याला लाल राक्षस तारा म्हणून ओळखले जाते तसेच ह्याला मरणारा तारा अशी ही ओळख आहे. जे तारे लाल रंगात चमकतात त्यांना प्रामुख्याने मारणारा तारा असे संभोधले जाते कारण, ह्या ताऱ्यांतील हैड्रोजन वायू कमी होत आहे आणि काही वर्षांनी हे तारे मरणार/फुटणार आहेत. (काही वर्ष म्हणजे लाखो किव्हा अब्ज वर्ष 😁). आर्कटर्स तारा पाहून झाल्यावर, मिहीरने सप्तर्षी ऋषी आणि त्याच्या पत्नींची दंत कथा सांगून, सप्तर्षी नक्षत्रातील एका ताऱ्याच्या बाजूलाच असलेलया लपलेला तारा दुर्बीने द्वारे दाखवला, हा तारा उघड्या डोळ्याने दिसत नाही! या नंतर आम्हाला मिहीरने लाईट फोटोग्राफी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. लाईट फोटोग्राफी करून झाल्यावर मिहीरने पुन्हा एकदा दुर्बीण चंद्राच्या दिशेने वळवली, आणि सर्व सहभागींना मोबाईल मध्ये चंद्राचे फोटो दुर्बीनेद्वारे काढण्याची संधी दिली. आम्ही पण आमच्या मोबाईल मध्ये चंद्राचे फोटो काढले ते खालील प्रमाणे.
 |
| दुर्बिणीच्या साह्याने मोबाईल मध्ये काढलेला फोटो |
चंद्राचे फोटो काढून झाल्यावर, मोबाईल मध्ये काढलेल्या फोटो मध्ये दिसणाऱ्या खड्यांची नावे मून अटलसच्या (चंद्राचा नकाशा) साह्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रतीक्षा होती ती सूर्योदयाची आणि शुक्र ग्रह पाहण्याची, पण ढगाळ वातारवर्णामुळे सूर्य नारायणाचे व शुक्र ग्रहाचे दर्शन काय होईना 😢. सूर्य आणि शुक्र ग्रह काय दिसणार नाही हे निश्चित झाले होते, म्हणून आम्ही जवळील वाहणाऱ्या उल्हास नदीकाठी गेलो. थोडा वेळ नदीकाठी बसलो आणि पुन्हा मैदानात आलो. अचानक पावसाचे थेम्ब पडू लागले आणि मिहीरची घाई उडाली, कारण दुर्बीण झाकणे महत्वाचे होते. दुर्बीण बंद करून ऑफिस मध्ये ठेवायला मिहीरला मदद केली, आणि तेथील ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी पहिल्या, तसेच वर्तमानपत्रात महिरीचे लेख व मुलाखतीचे कात्रण पाहिले. पुन्हाएकदा सर्वजण कँटीन मध्ये पोहचलो ते न्ह्यारी साठी, मिसळ पाव ताव मारत पोटपूजा केली आणि चहा पियाल्यावर, डॉर्मेटरी मध्ये जाऊन आवरा आवर केली आणि सुंदर आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
अविस्मरणीय अनुभव आणि दिलेल्या मौल्यवान माहिती बद्दल मिहीर आणि होरायझन टीमचे मनपूर्वक आभार!
 |
| ग्रुप फोटो |
 |
| कॅन्डीड फोटो |
 |
| ट्रस ट्यूब डॉब्सोनियन टेलिस्कोप |