प्रवासाची तारीख: २५ जानेवारी, २०२६वाहतुकीची पद्धत: सार्वजनिक वाहतूक (बस).
आयुष्य म्हटलं कि चड उतार आलेच, २०२३ - २०२४ मध्ये देवाच्या कृपेने भरपूर भटकंती झाली होती. मे २०२५ ला केदारनाथ व तुंगनाथ ट्रेक नंतर भटकंतीला जणू स्वल्पविराम लागला. परिवारीक संकटांना तोंड देतादेता सहा महिने कसे गेले कळलच नाही आणि जखमेवर मीठ चोळणारी गोष्ट म्हणजे, रामेश्वरम, मदुराई, जिंजी सहल करीत आठ दिवस कामावर सुट्टी आणि ट्रेनचे आरक्षणही पक्के असताना तिकीट रद्द करावी लागली होती. मन दुखी होते पण चिडचिडेही झाले होते, या आजाराव औषध म्हणजे एकदिवसाची भटकंती. एकादिवसात घरी परतणे गरजेचे होते, त्यानुसार भटकंतीचे नियोजन करणे आवश्यक होते. २५ जानेवारी रविवार, धाकट्या बंधुंना सुट्टी असल्या कारणाने, घराची जवाबदारी त्याच्यावर सोपवून आपण भटकंती करीत घराबाहेर पडायचे असे ठरले. मुंबई नजीक भटकंती करिता बरीच ठिकाणे आहेत, पण नक्की कोणत्या ठिकाणी जायचे हे ठरत नव्हते. तसेच सोबतीला मित्र असतील तर प्रवास आणिखीन सुंदर होईल, पण यावेली नेहमीचे ट्रेकर्स मित्र मात्र त्याच्या वैयक्तिक कामात अडकले होते. म्हणून वॉट्सअँप ग्रुप वरील "Sahyadri Mumbai TTMM Community" या ग्रुप वर कोणी काही जाहिरात टाकली आहे का शोधायला सुरवात केली. अभिषेक धर्माधिकारी यांची जाहिरात नजरेस पडली, "कोर्लाई, रेवदंडा, रामेश्वर मंदिर, कनकेश्वर मंदिर". रात्री २ वाजता त्यांना मेसेज करून ठेवला, सकाळी त्यांचा मेसेज आला, नियोजनाविषय चौकशी केली असता कळले कि रविवारी सकाळी ७:३० वाजता पनवेलला पोहचायचे होते. गोरेगावहून पनवेलला सकाळी ७:३० ला पोहचणे थोडे अवघडच होते, त्यावेळी अभिजित ने दादरहून बसने येण्याचा सल्ला दिला. मी त्यांना संध्याकाळ पर्यंत कळवतो असे सांगून, तयारीला लागलो.
नेहमी प्रमाणे शैलेश दादाला, विचारून ठिकाणांची माहिती घेत नियोजन कश्या प्रकारे आहे हे त्याला सांगितले. ठिकाणांची नावे ऐकताच क्षणी दादाने सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून होणार नाहीत असे सांगितले. यामुळे जायचे कि नाही असा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला, पण दादाने सांगितले कि एक - दोन ठिकाणे पाहून झाली तरी चालतील पण तू जाऊन ये. मग काय जो होगा देखा जायेगा म्हणत अभिषेकला होकार कळवळा आणि बॅग भरायला सुरवात केली. या वेळेची भ्रमंती माझ्यासाठी थोडी वेगळी होती, यावेळी माझ्या सोबत नेहमीचे मित्र नव्हते. अनोळखी व्यक्तींसोबत भ्रमंती होणार होती. समोरची व्यक्ती कशी असेल, स्वभाव कसा असेल, असे असंख्य प्रश्न डोक्यात दरवळत असले तरी, भटकंती करिता घरा बाहेर पडायचे हे निश्चित होते. पहाटे ३:३० चा गजर लावून झोपी गेलो.
प्रवास वर्णन
पहाटे ३:३० च्या गजराच्या आवाजाने उठलो खरे पण झोप काही पूर्ण झाली नव्हती, तयार होऊन सुमारे ४:३० ला घरा बाहेर पडलो. इमारती खाली पहाटेची पहिली बसची प्रतीक्षा करत असते वेळी, वॉचमन काकांनी सांगितले कि आज रविवार असल्या कारणाने पहिली बस उशिरा येते. मला दादरला पोहचायला उशीर होऊनये म्हणून मी उबर ऑटोने गोरेगाव स्थानकात पोहचलो. पहाटे ४:५६ ची चर्चगेट लोकल पकडली, सांताक्रूझला पोहचलो असताना, अभिषेकाचा फोन आला आणि तो म्हणाला, आपला प्लॅन कॅन्सल झाला आहे. आपल्या सोबत येणारे २ ते ३ जण नाही येत आहेत. हे ऐकून मी निराश झालो, पण त्याच क्षणी मी अभिषेकला आपण दोघेच जाऊ असे सांगितलं आणि अभिषेकही तयार झाला. ५:४० च्या दरम्यान दादर स्थानकात उतरलो आणि पूर्व दिशेला बाहेर येत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (इस्टर्न एक्सप्रेस हायवे) च्या दिशेने चालत गेलो. एस टी बसेस कुठे थांबतात हे मला ठाऊक नव्हते, अंदाजे गेलो होतो. तेथील एका व्यक्तीला विचारले असता त्याने उजवीकडे (लालबागच्या) दिशेने जायायला सांगितले. काही अंतर पुढे गेल्यावर पुण्याला जाण्याऱ्या शिवनेरी बसेस दिसल्या. तिथे जाऊन चौकशी केली असता, कंडक्टर काकांनी बाहेर हायवेच्या कडेला जाण्यास सांगितले. अंदाजे सकाळी ०६:२० ला मुंबई - मुरुड बस आली, बस मध्ये चढलो आणि आरक्षण नसल्या कारणाने थेट मागच्या सीट वर जाऊन बसलो. शेवटच्या सीट आरक्षित नसल्या कारणाने मला शेवट पर्यंत बसायला मिळाले. कंडक्टर काकांकडून कोरलाईचे तिकीट घेतले आणि अभिषेकला कळवले कारण तो पनवेलहुन बस मध्ये चढणार होता व त्याने त्याचे आरक्षण आधीच केले होते.
अंदाजे ७:४० च्या दरम्यान बस पनवेलला पोहचली, अभिषेक सोबत अजून एक व्यक्ती होती (कविता चाळके). म्हणजे आता भटकंती करीत आम्ही दोघान ऐवजी तिघे होतो. जसजशी बस पुढे जात होती तसतसे माझे लक्ष घड्याळाकडे जात होते आणि कोर्लाईला पोहचायला किती वेळ लागणार याचा अंदाज लावत होतो. अंदाजे ११:२० पर्यंत पोहचणार असे वाटत होते. सुमारे १०:२० च्या दरम्यान बस अलिबाग बस स्थानकात पोहचली आणि कंडक्टरने सूचना दिली कि, बस २० मिनिटे सी.एन.जी भरण्याकरिता थांबणार आहे, सर्वानी खाली उतरा. म्हणजे पोहचायला अजून उशीर होणार! यावेळेत आम्ही न्ह्यारी करून घेतली आणि पुन्हा डेपोत येऊन बसच्या प्रतीक्षेत उभोत होतो. बस आली खरी पण अन-आरक्षित प्रवासी सर्वात आधी बस मध्ये चढले आणि बस भरली. आरक्षण असलेल्या प्रवाश्यांना मात्र बस बाहेरच उभे राहावे लागले. यामुळे कंडक्टरने सर्व प्रवाश्यांना खाली उतरवले आणि आरक्षण असलेल्या प्रवाश्यांना पहिले आत घेतले. या सर्व घडामोडीत अजून २० मिनिटे वाया गेली. म्हणजे आम्हाला आता कोर्लाईला पोहचायला ११:२० च्या ऐवजी दुपारी १२:०० वाजणार होते. बस अलिबाग डेपोतून बाहेर पडली आणि काही अंतर पुढे गेली आणि ट्राफिक मध्ये अडकली. चौल चौक पर्यंत ट्रॅफिक मधेच अडकल्या असल्या कारणाने अंदाजे ४० मिनिटे वाया गेली आणि आम्ही दुपारी ०१:०५ ला कोरलाई बस थांबायला उतरलो.
कोरलाई गड
कोर्लाई बस थांब्या पासून ते कोर्लाई गडाच्या पायथ्यापर्यंत चालत पोहचायला १५ मिनिटे लागली. गूगल मॅप्सची मदद घेत आम्ही गडाच्या दिशेने चालत असते वेळी, एका स्थानिक व्यक्तीने आम्हाला मदद केली. गावातून न जाता, समुद्र किनारी असणाऱ्या सरळ वाटेने आम्हाला जाण्यास सांगितले. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या शिव मंदिराच्या मागच्या बाजूने गडावर जाणारी वाट आहे, तसेच गडाला प्रदक्षिणा घालून गडाच्या उत्तर दिशेने सुद्धा गडावर प्रवेश करता येतो. हा गड एका टेकडीवर वसलेला असून जास्त उंचीवर नाही. आम्ही दक्षिण दिशेने, शिव मंदिराच्या मागच्या बाजूने टेकडी चढायला सुरुवात केली आनंद अवघ्या २० मिनिटात गडाच्या प्रवेश द्वारा समोर पोहचलो आणि काही क्षणासाठी इतिहासात हरवून गेलो.
चौल व कोर्लाई गडाचा इतिहास
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील चौल हे गाव आणि त्याच्या जवळ असलेला कोर्लाई किल्ला हे कोकणच्या सागरी इतिहासातील अतिशय महत्त्वाचे केंद्र मानले जाते. प्राचीन काळापासून ते पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रजांपर्यंत अनेक सत्तांनी या प्रदेशावर आपला प्रभाव गाजवला. व्यापार, युद्ध, धर्म आणि संस्कृती यांचे अनोखे मिश्रण येथे पाहायला मिळते.
चौलचा इतिहास इ.स.पू. ३०० ते ४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. प्राचीन काळी चौल अनेक नावांनी ओळखले जायायचे जसे कि खालील प्रमाणे.
चंपानगरी : प्राचीन पौराणिक संदर्भांनुसार चौलचा उल्लेख 'चंपानगरी' किंवा 'चंपानवती' असा आढळतो.
सिम्युल : इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात, ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमी (Ptolemy) याने आपल्या नोंदींमध्ये या बंदराचा उल्लेख 'सिम्युल' किंवा 'टिमुला' असा केला आहे.
चेमुल : कान्हेरी आणि नाणेघाट येथील शिलालेखांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख 'चेमुल' किंवा 'चिमुलो' असा आढळतो.
सिमुर : १० व्या शतकातील अरबी प्रवाशांनी (उदा. अल-मसुदी) या शहराचा उल्लेख 'सिमुर' किंवा 'सैमूर' असा केला आहे.
रेवदंडा : पोर्तुगीज काळात चौळच्या एका भागाला 'रेवदंडा' असे नाव मिळाले, जे आजही प्रचलित आहे.
- सातवाहन, शक, कुशाण, वाकाटक व चालुक्य राजवटींच्या काळात चौल एक प्रमुख बंदर होते.
- रोमन साम्राज्याशी थेट व्यापार चालत असल्याचे पुरावे सापडतात.
- रोमन नाणी, मणी, मृद्भांडी व पुरातत्त्वीय अवशेष येथे सापडले आहेत.
- अरब आणि पर्शियन व्यापारी चौलमध्ये नियमित ये-जा करत असत.
- चौलमधून मसाले, कापूस, कापड, रत्ने, हत्ती-दात आणि सुगंधी पदार्थ यांची निर्यात होत असे.
चौल हे केवळ व्यापारी बंदर नव्हते तर ते एक महत्त्वाचे धार्मिक केंद्रही होते.
- बौद्ध काळात येथे स्तूप, विहार आणि गुंफा उभारल्या गेल्या.
- हिंदू राजवटींच्या काळात मंदिरे उभारली गेली.
- नंतर इस्लामी व पोर्तुगीज प्रभावामुळे विविध धर्मांचे सहअस्तित्व दिसून येते.
१५व्या शतकात पोर्तुगीज भारतात आले आणि त्यांनी चौलचे महत्त्व ओळखले.
- इ.स. १५०७ मध्ये पोर्तुगीजांनी चौलमध्ये आपली वसाहत स्थापन केली
- त्यांनी चौलला “Chaul de Baixo” (खालचा चौल) आणि “Chaul de Cima” (वरचा चौल) अशा दोन भागांत विभागले
- अनेक चर्च, किल्ले आणि व्यापारी गोदामे बांधली ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. आजही चौल–रेवदंडा परिसरात पोर्तुगीज स्थापत्यशैलीचे अवशेष पाहायला मिळतात.
कोर्लाई किल्ल्याचा इतिहास- इ.स. १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी कोर्लाई किल्ल्याची उभारणी केली
- पोर्तुगीजांनी त्याला “मॉरो दे चौल" (Morro de Chaul) असे नाव दिले
- चौल बंदराचे संरक्षण करणे हे किल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट होते
- इ.स. १६५७ - १६६० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहिमा सुरू केल्या.
- इ.स. १६६५ च्या आसपास कोर्लाई किल्ला जिंकण्याचा प्रयत्न झाला, मात्र: मजबूत तटबंदी, समुद्राकडून संरक्षण यामुळे किल्ला पूर्णपणे जिंकता आला नाही.
- १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लाईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.
कोर्लाई = “कोर + लई (किंवा लई/लई)”
कोर → कडा / टोक / उंच सुळका
लई → जागा / भूभाग (जुना देशी शब्द)
अर्थ:
----------समुद्राकडील उंच कडा / टोकावरचं ठिकाण
हे अर्थ भौगोलिकदृष्ट्या अगदी अचूक बसतात, कारण कोर्लाई किल्ला समुद्राला लागून उंच कड्यावर आहे.
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
कोर्लाई गड भ्रमंती
इतिहासातून वर्तमानात येत गड भ्रमंतीला सुरुवात केली. गडाचा प्रवेशद्वार व बुरुज सुस्तिथित आहे, थोडीशी डागडुजी आणि पुरातत्व खात्याच्या इच्छा शक्तीची गरज आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर पोर्तुगीझ भाषेतील शिलालेख व काही चिन्हे आहेत.
 |
| गडाचा दक्षिण प्रवेशद्वार |
 |
| मुख्य प्रवेशद्वारावरील राजचिन्हे व शिलालेख |
वरील फोटो मधील चिन्हे व शिला लेखाची माहिती
१. चिन्हे: पोर्तुगीज हेराल्ड्री (राजचिन्ह शास्त्र)
हे कोरीव काम पोर्तुगीज साम्राज्यशाहीच्या प्रतिमाशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
शाही राजचिन्ह: मध्यभागी असलेल्या चौरस चौकटीत एकेकाळी पोर्तुगालचे अधिकृत ढाल-चिन्ह होते.
सात किल्ले: मुख्य चौकटीच्या उजव्या बाजूला तुम्हाला "किल्ल्याचे" चिन्ह स्पष्टपणे दिसते. हे पोर्तुगालने पुन्हा जिंकलेल्या मूरिश (Moorish) शहरांचे प्रतिनिधित्व करतात.
शोभेची पाने: चौकटीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेली पानांसारखी कोरीव कामे ही १७ व्या शतकातील पोर्तुगीज "मॅन्युलाइन" किंवा "बरोक" वास्तुशैलीतील शोभेच्या खुणा आहेत.
२. शिलालेख
हा मजकूर प्राचीन पोर्तुगीज भाषेत आहे आणि दगडावर जागा वाचवण्यासाठी अनेक संक्षेपांचा (Abbreviations) वापर करण्यात आला आहे. शिलालेखातील मजकूर जीर्ण झाल्या असल्या करणारे, तो वाचणे शक्य नाही.
“Del-Rei” हा शब्द पोर्तुगीज राजासाठी वापरला जात असे
“Anno” ही लॅटिन-प्रभावित तारीख पद्धत आहे
“Fortaleza / Castelo” हे शब्द लष्करी स्थापत्य सूचित करतात
प्रवेश द्वाराच्या आत जाऊन डावीकडे वळून काही पायऱ्या चढल्यावर आम्ही गडमाथ्यावर पोहचलो. अगदी समोरच आपल्याला एक भली मोठी वास्तू दिसते, ही वास्तू म्हणजे पूर्वी काळचे चर्च. अजूनही ही वास्तू सुस्तिथित आहे. चर्चच्या प्रवेश कमानीवर थोडेफार नक्षीकाम केले आहे. फोटो काढले आणि पुढे निघालो.
 |
| गडावरील चर्च |
चर्चच्या समोर एका वाड्याचे जोते आहे, चर्चच्या मागच्या बाजूस गेल्यावर एक प्रवेशद्वार लागतो त्यावर सुद्धा एक राज चिन्ह (कोट ऑफ आर्म) आणि मजकूर लिहलेला आहे.
 |
| कोट ऑफ आर्म |
वरील चित्रात गोलाकार खगोलीय यंत्राचे जे चिन्ह दिसत आहे, त्याला 'आर्मिलरी स्फिअर' म्हणतात.
शिलालेखातील मजकूर
-------------------------
खालचा मजकूर खूप झिजलेला आहे, पण पोर्तुगीज किल्ल्यांवरील समान शिलालेखांशी तुलना करून खालील मजकूर जवळजवळ निश्चित करता येतो.
GOVERNADOR E CAPITÃO GERAL
DO ESTADO DA ÍNDIA
MANDOU FAZER
ESTA FORTALEZA
NO TEMPO DO
REI D. JOÃO
SENDO GOVERNADOR
E CAPITÃO GERAL
...
ANO DE 1XXX
मराठी अनुवाद
--------------------
“GOVERNADOR E CAPITÃO GERAL DO ESTADO DA ÍNDIA”
भारत राज्याचा (Estado da Índia) गव्हर्नर व सेनापती
“MANDOU FAZER ESTA FORTALEZA”
ही किल्लेबांधणी करण्याचा आदेश दिला
“NO TEMPO DO REI D. JOÃO”
राजा डोम जोआओ यांच्या कारकिर्दीत
“SENDO GOVERNADOR E CAPITÃO GERAL …”
त्या वेळी गव्हर्नर व सेनापती म्हणून (अमुक व्यक्ती कार्यरत होती)
(नाव आता स्पष्ट दिसत नाही)
“ANO DE 1XXX”
इ.स. १५०० च्या आसपासच्या एखाद्या वर्षी
(अचूक वर्ष झिजल्यामुळे वाचता येत नाही)
इमारतीच्या / बुरुजाच्या प्रवेशद्वारातून आम्ही पलीकडच्या बाजूस गेलो (गडाचा दक्षिणेकडील शेवटचा भाग). डाव्या बाजूला दोन तोफा ठेवलेल्या आहेत तर उजव्या बाजूला एक मंदिर / देवळी सदृश्य वास्तू आहे. थोडे पुढे चालत जाऊन आम्ही गडाच्या शेवटच्या टोकाकडे पोहचलो. काहीवेळ तिथे घालवला आणि मागे परतलो आणि पुन्हा चर्च जवळ आलो. चर्च जवळ थोडा वेळ घालवला आणि अगदी विरुद्ध दिशेला असलेले (उत्तरेकडील) दरवाज्याकडे निघालो. तेथे जात असते वेळी जमीनीवर ठेवलेला भाला मोठा शिलालेख आंधळा तो खालील प्रमाणे.
.jpg) |
| पोर्तुगीज राजाचा अधिकृत शिलालेख |
दगड आडवा ठेवलेला आहे, नंतर तुटलेला (बहुधा मराठा काळात किंवा नंतर पुनर्बांधणी करताना), मजकूर लॅटिन लिपीत कोरलेला आहे. उजव्या बाजूला सजावटीची फुलांची / वेलबुट्टी नक्षी मजकूर लॅटिन लिपीत कोरलेला आहे. एक चौकोनी छिद्र (लाकडी तुळई / दरवाजा अडकवण्यासाठी)
हा दगड मूळचा प्रवेशद्वार किंवा प्रशासकीय इमारतीचा शिलालेख असून. हा रॉयल फौंडेशन इन्क्रिप्शन प्रकारचा शिलालेख आहे. हा पोर्तुगीज राजाचा अधिकृत शिलालेख असून, पूर्ण किताब फक्त राजकीय / शासकीय शिलालेखांवरच वापरला जात असे.
शिलालेखातील मजकूर
-------------------------
DOM IOANNES
PORTVGAL ET ALGARVES REX
MANDOU FAZER
ESTA FORTALEZA
मराठी अनुवाद
--------------------
"DOM IOANNES"
डोम जोआओ (Portuguese King John)
"PORTVGAL ET ALGARVES REX"
पोर्तुगाल व आल्गार्व्हेसचा राजा
हा फार महत्त्वाचा राजकीय किताब आहे (पोर्तुगीज राजे अधिकृतपणे असा उल्लेख करत)
"MANDOU FAZER ESTA OBRA / FORTALEZA"
ही इमारत / किल्ला बांधण्याचा आदेश दिला
पूर्ण अर्थ
------------
पोर्तुगाल व आल्गार्व्हेसचा राजा डोम जोआओ यांच्या आदेशाने ही किल्लेबांधणी करण्यात आली.
वरील शिलालेख पाहून आम्ही पुढे निघालो उत्तरेकडील दरवाजाकडे, या दरवाज्याच्या कमानीवर सुद्धा एक शिलालेख आहे व त्यावर मजकूर कोरलेला आहे तसेच दरवाज्याच्या उजवीकडे अजून एक छोटासा चार अक्षरी शीलालेख किव्हा दगडी पाठी बसवलेली आहे, ती खालील प्रमाणे.
.jpg) |
| पोर्तुगीज राजसत्तेचा शाही शिलालेख - Coat of Arm |
वरील प्रतिमेचे स्पष्टीकरण
-----------------------------
वरचा भाग – राजचिन्ह (Coat of Arms)
मुकुट (Crown) → पोर्तुगीज राजा
ढाल (Shield) → राजकीय सत्ता
ढालीत ५ लहान ढाली (quinas)
प्रत्येक लहान ढालीत ५ ठिपके (ख्रिस्ती श्रद्धा व राजवैधता)आजूबाजूला वेलबुट्टी नक्षी → शाही/राजकीय स्मारक
दगडावरील मजकूर – अक्षरांनुसार वाचन
------------------------------------------
खालचा मजकूर खूप झिजलेला आहे, पण पोर्तुगीज किल्ल्यांवरील समान शिलालेखांशी तुलना करून खालील मजकूर जवळजवळ निश्चित करता येतो.
SOBRE O REINADO DE
DOM JOÃO
REI DE PORTUGAL
E DOS ALGARVES
SENDO GOVERNADOR
E CAPITÃO GERAL
DO ESTADO DA ÍNDIA
...
MANDOU FAZER ESTA OBRA
(मधल्या ओळींत गव्हर्नरचे नाव व अचूक वर्ष होते, पण ती अक्षरे आता पूर्ण झिजली आहेत.)
मराठी अनुवाद
--------------------
"SOBRE O REINADO DE DOM JOÃO"
राजा डोम जोआओ यांच्या कारकिर्दीत
"REI DE PORTUGAL E DOS ALGARVES"
पोर्तुगाल व आल्गार्व्हेसचा राजा
(हा पोर्तुगीज राजांचा अधिकृत किताब आहे)
"SENDO GOVERNADOR E CAPITÃO GERAL DO ESTADO DA ÍNDIA"
भारत राज्याचा (Estado da Índia) गव्हर्नर व सेनापती असताना
(Estado da Índia म्हणजे गोवा केंद्र असलेले पोर्तुगीज भारतातील राज्य)
"MANDOU FAZER ESTA OBRA"
ही इमारत / किल्ला बांधण्याचा आदेश दिला
संपूर्ण अर्थ
----------------
पोर्तुगाल व आल्गार्व्हेसचा राजा डोम जोआओ यांच्या कारकिर्दीत, भारतातील पोर्तुगीज राज्याचा गव्हर्नर व सेनापती असताना, हा किल्ला (ही बांधणी) राजाच्या आदेशाने करण्यात आली.
.jpg) |
| दरवाज्याच्या उजव्या बाजूस दगडी पाठी |
वरील अक्षरे आता स्पष्ट दिसत नसली तरी, S आणि R ही अक्षरे स्पष्ट दिसत आहेत, पुरातत्व विभाच्या गॅझेटिअरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कोर्लाई किल्ल्यावर S.P.Q.R. ही अक्षरे पोर्तुगीज प्रशासकीय सत्तेचा पुरावा म्हणून कोरली होती.
SPQR चा अर्थ: ही अक्षरे S.P.Q.R. (Senatus Populusque Romanus) अशी आहेत. पोर्तुगीज साम्राज्यात हे चिन्ह सत्तेचे प्रतीक म्हणून वापरले जाई.
पोर्तुगीज वापर: पोर्तुगीज साम्राज्याने रोमन–ख्रिस्ती (Roman-Christian) परंपरेचा वैचारिक वारसा स्वीकारला होता. म्हणून त्यांनी Latin भाषा, रोमन शैलीची संक्षिप्त अक्षरे, imperial authority दर्शवणारी चिन्हे त्यांच्या जगभरातील किल्ल्यांवर (कोर्लाई, वसई, दीव इ.), प्रशासकीय इमारती आणि शिलालेखांवर केलेला आढतो.
शिलालेखांचे फोटो काढून आम्ही गडाच्या तिसऱ्या भागात गेलो, डावीकडे एक पडकी वास्तू आहे, आत काही नसल्याने दुर्लक्ष करून आम्ही पुढे गेलो, तसेच उजवीकडे बुरुजावर जाण्याकरिता पायऱ्या आहेत. सोमोर एक तुळशी वृंदावन दिसले, त्याच्या मागे एक अज्ञात वीराची समाधी आहे व तुळशी वृंदावनाच्या समोर रत्नेश्वर शिव मंदिर आहे. थोडेसे मागे वळून पायऱ्या चालून बुरुजावर गेलो. बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे. बुरुजावरून रेवदंड्याचा परिसर सुंदर दिसत होता तसेच गार्डावरचे वास्तू द्रोण व्हिव प्रमाणे दिसत होते. बुरुजावरून खाली उतरतेवेळी, एक पर्यटक दोरीच्या साहाय्याने बालदीतून पाणी काढताना दिसला, ही तीच वास्तू जिला आम्ही दुर्लक्षित केले होते. या वास्तू मध्ये पाण्याची टाकी आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून टाकी वरून बांधून काढलेली आहे. पाणी स्वच्छ पिण्या योग्य आहे. पाण्याने तोंड धुऊन तरतरीत झालो आणि उर्वरित गड पाहायला निघालो.
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
 |
| रत्नेश्वर शिव मंदिर |
रुंदीला गड छोटा असला तरी लांबीला मात्र बराच मोठा आहे, प्रत्येक दरवाजा ओलांडला कि गडाचा अजून एक भाग समोर येतो. अजून एक प्रवेशद्वार ओलांडून आम्ही गडाच्या चौथ्या भागात पोहचलो (दक्षिणेकडून ते उत्तरेकडील). या भागात कोणतीही वास्तू नाही, पुरवील काळी असेलही पण सध्या हा भाग रिकामाच दिसतो.
समोर अजून एक प्रवेश द्वार दिसतो, अंदाजे ही एक इमारत / वॉच टॉवर असावा. या प्रवेशद्वाराची लांबी अंदाजे १२-१५ फूट असावी, यामुळे आपण भुयारातून जात असल्यासारखे वाटते. या इमारतीच्या दोनही बाजूला बुरुज आहेत ओर त्यावर तोफा ठेवलेल्या आहेत. लगेचच अजून एक प्रवेशद्वार लागतो. या प्रवेशद्वारातून बाहेर पडताच काही पायऱ्या (जीर्ण झाल्यात) उत्तराव्या लागतात. या भागातून गडाची रुंदी कमी होत जाते (हा गडाचा पाचवा भाग). काही अंतर पुढे गेल्यावर डाव्याबाजूला दीपस्तंभ दिसतो. गडावरून एक वाट दीपस्तंभाकडे जाते, वेळे अभावी आम्ही दीपस्तंबादकडे जाणे टाळले.
 |
| गडावरील प्रवेशद्वार |
काही अंतर पुढे गेलो आणि वाटले गड फेरी संपली, पण तसे नव्हते अजून एक प्रवेशद्वार दिसला. आता मात्र वाटू लागले बास झाले आता. मी आणि अभिषेकने हा दरवाजा ओलांडून पलीकडच्या बाजूस गेलो खरे पण, थकवा मुळे पुढे जायची हिम्मत होत नव्हती (गडाचा सहावा भाग). आम्ही दोघे दरवाज्या पाशी बसून आराम करत होतो इतक्यात, कविता आली आणि तिने पुढे कायचे ते पाहून येत असे सांगून निघाली. काही वेळानी कवितां ने फोन करून आम्हाला बोलावून घेतले. पुढे गेलों आणि अजून एका दरवाज्या पाशी पोहचलो. खालच्या आणि शेवटच्या सातव्या भागात मात्र आम्ही वेळे अभावी जायचे टाळले. वरूनच पाहणी केली तेथील बुरुजांवर सुद्धा तोफा ठेवलेल्या आहेत. आणि इथेच गडफेरी संपवून आम्ही माघारी फिरलो.
 |
| गणेश दरवाजा (संत. फ्रॅंसिस झेवियर दरवाजा) |
 |
| क्रुसाची' बातेरी |
माघारी येते वेळी प्रवेशद्वाराच्या कडेला अजून एक शिलेख आढळला तो खालील प्रमाणे.
यावर "S. FRAN. XAVIER" (St. Francis Xavier) असे नाव कोरलेले आहे.
संदर्भ: सेंट फ्रान्सिस झेवियर हे पोर्तुगीज काळात भारतात आलेले प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मप्रचारक होते. गडाच्या बुरुजाला त्यांचे नाव देण्यात आले होते.
१७३९ मध्ये जेव्हा सुभानराव माणकर यांनी हा किल्ला जिंकला, तेव्हा त्यांनी या बुरुजांची मराठी नावे ठेवली:
सां दियागो बुरुजाचे नाव बदलून पुस्ती बुरूज केले.
सां फ्रांसिसकु बुरुजाचे नाव बदलून गणेश बुरूज केले.
*ह्याच संत. फ्रान्सिस झेवियर यांचे शव बाहेर काडून, पोर्तुगीझ प्रार्थना करू लागले होते, जेवहा छत्रपती संभाजी महाराज्यांनी १६८३ मध्ये गोव्यावर आक्रमण केले होते.
कोरलाई गड तासाभरात फिरून होईल असे वाटले होते, पण गड इतका लांबलचक आहे कि आमचे दोन तास गेले. आम्हाला बऱ्याच ठिकाणी जायचे राहिले, अजून वेळ असता तर तेथे हि गेलो असतो. अंदाजे दुपारी २:४० ला आम्ही गड उतार झालो. गडाच्या पायथ्याशी, कोरलाई गावात येयला अवघे७- १० मिनिटे लागली. पायथ्याशी असलेलया शिव मंदिराला भेट दिली. महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिरात थोडा वेळ घालवला. मंदिराच्या समोरील झाडीत सतीशिळा दिसली, सतीशिळेचे फोटो काढले आणि कोर्लाई बस थांब्याच्या दिशेने निघालो.
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
 |
| पारंपरिक कोकणी कवलारू शिवमंदिर (गड पायथा - कोर्लाई गाव) |
 |
| शिवमंदिर समोरील सतीशिळा |
सतीशिळा हे मध्ययुगीन भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे स्मारक आहे, जे एखाद्या स्त्रीने आपल्या पतीच्या निधनानंतर केलेल्या 'सती' जाण्याच्या घटनेची स्मृती म्हणून उभारले जाते.
सतीशिळेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि अर्थ खालीलप्रमाणे आहेत:
सतीशिळेची रचना
सतीशिळा सहसा एका उभ्या दगडाच्या स्वरूपात असते, ज्यावर काही ठराविक चिन्हे कोरलेली असतात:
आशीर्वाद देणारा हात: शिळेवर एका स्त्रीचा कोपरापासून वर केलेला हात कोरलेला असतो. हा हात तळहात समोर करून आशीर्वाद देण्याच्या स्थितीत असतो.
बांगड्या आणि लिंबू: हातामध्ये बांगड्या भरलेल्या दिसतात, जे सौभाग्यवती असण्याचे प्रतीक आहे. हाताच्या अंगठ्या आणि तर्जनीमध्ये अनेकदा एक लिंबू धरलेले दाखवले जाते.
चंद्र-सूर्य: शिळेच्या वरच्या भागात चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात. याचा अर्थ असा की, "जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत या स्त्रीचे पुण्य आणि स्मृती अमर राहील".
दंपती: खालच्या भागात अनेकदा पती आणि पत्नी (सती गेलेली स्त्री) यांची आकृती कोरलेली असते.
कोर्लाई बस थांब्याकडे जाते वेळी, वाटेत एक दीपस्तंभ दिसला. आम्ही तिथे पाणी पिण्यासाठी थांबलो असत एक ऑटो रिक्षाहि दिसली. आम्ही रेवदंड्याला बसने जाणार होतो, पण वेळ वाचवण्याकरिता रिक्षाने जायचे ठरविले. रिक्षा वाले काकांना विचारले असता मानसी ४० रुपये सांगितले. कसलाही विचार न करता रिक्षात बसलो आणि अवघ्या १० मिनिटांमध्ये रेवदंडा किल्ल्या जवळ पोहचलो.
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
रेवदंडा गड
आम्ही रेवदंडा रिक्षा स्टॅन्ड - तिट्या जवळ उतरलो. ५ मिनिटे चालत पुढे गेलो आणि पोहचलो ७ माजली बुरुज जवळ. २०२३ साली मी येथे आलो होतो, त्यावेळेला इतिहासाची एवढी माहिती नव्हती, यावेळी मात्र थोडा फार अभ्यास करून आलो होतो.
रेवदंडा / चौल गडाचा इतिहास
रेवदंडा किल्ला (ज्याला चौलचा किल्ला असेही म्हणतात) हा कोकण किनारपट्टीवरील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक जलदुर्ग आहे. याचा इतिहास प्रामुख्याने पोर्तुगीज, मराठा आणि आंग्रे यांच्या संघर्षाभोवती फिरतो.
रेवदंडा गडाच्या इतिहासातील काही प्रमुख टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
१. पोर्तुगीज पायाभरणी (१६ वे शतक)
- बांधकाम (१५२४): पोर्तुगीजांनी अहमदनगरच्या निजामशाहीशी करार करून येथे आपली वखार आणि किल्ला बांधला.
- व्यापारी केंद्र: त्याकाळी चौळ हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मोठे केंद्र होते. रेवदंडा किल्ल्यामुळे पोर्तुगीजांना या बंदरावर आणि अरबी समुद्रातील व्यापारावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले.
- वास्तुशैली: हा किल्ला भव्य असून त्याच्या भिंती आणि बुरूज युरोपियन शैलीत बांधलेले आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये अनेक चर्च, राजवाडे आणि प्रशासकीय इमारतींचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
२. मराठा साम्राज्याचा विजय (१७३९)
- चिमाजी अप्पांची मोहीम: १७३९ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोठी मोहीम उघडली. वसईच्या विजयानंतर मराठ्यांचे लक्ष रेवदंडा आणि कोर्लई किल्ल्यांकडे वळले.
- सुभानराव माणकर यांची कामगिरी: चिमाजी अप्पांनी सुभानराव माणकर यांना रेवदंडा आणि कोर्लई जिंकण्यासाठी पाठवले होते. प्रदीर्घ संघर्षांनंतर मराठ्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला.
- बदलेले नाव: मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचे नाव 'रेवदंडा' म्हणून अधिक प्रचलित झाले. या विजयामुळे पोर्तुगीजांची उत्तर कोकणातील सत्ता संपुष्टात आली. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
रेवदंडा गड भ्रमंती
वरील सांगितल्या प्रमाणे, २०२३ मध्ये आलो होतो, त्यामुळे येथे गडाची तटबंदी, सात माजली इमारत आणि एक बुरुजच शाबूत राहिला आहे हे ठाऊक होते. अभिषेक आणि कविताला सरळ सात माजली इमारती कडे नेले, सध्या वरचे दोन माजले पडले आहेत आणि आता ही इमारत पाच माजली आहे. इमारतीच्या दोनही बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा ठेवलेल्या आहेत. सातमजली इमारत पाहून झाल्यावर दोघांना थेट समुद्र किनारी नेले. तेथील तटबंदी वर शरबाचे शिल्प आहे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा पोर्तुगीझ गडावर शरबाचे शिल्प कसे काय असा प्रश्न मला पडला होता. नंतर कळले कि १७३९ मध्ये मराठ्यांनी हा गड जिंकला होता. कदाचित त्यावेळी तटबंदीची पुनर्बांधणी करतेवेळी शरबाचे शिल्प लावले असावे.
 |
| रेवदंडा गडाच्या तटावरील शरब शिल्प |
मागच्या वेळी आलो होतो तेव्हा
बुरुजावरील तोफ पाहायचे राहून गेले होते. या वेळी ती तोफ पाहायची असे ठरवले होते, पण बुरुजावर जाणारी वाट काही सापडत नव्हती. तेथील स्थानिक लोकांना विचारले असता, पलीकडच्या बाजूने वाट आहे आणि तुटलेल्या तटबंदीतून सुद्धा जाता येते असे सांगितले. समुद्राचे पाणी ताटाला भिडले होते, बूट भिजतील म्हणून तुटलेल्या तटबंदीतून बुरुजावर जायचे ठरले. तटाचे मोठे धारदार दगड, त्यावरील छोटी कालवे, यावरून चालून जाणे थोडे जिकरीचे होते, पण पर्यायही नव्हता. कसरत करून आम्ही बुरुजावर पोहचलो खरे पण तोफ काही दिसेना, तोफ समोरच होती पण चकवा लागल्यासारखे आम्ही हिंडत होतो. १० मिनिटांच्या शोध मोहिमे नंतर तोफ सापडली खरी पण बाजूला पडलेल्या दारूच्या बाटल्या पाहून मन दुखावले. सध्या हा गड तळीरामांचा अड्डा बनलेला आहे. असो, तोफेचे फोटो काढले,
तोफे मध्ये तोफगोळा अजून आहे हे ऐकले होते, पण तोफ सध्या गंजलेली आहे आणि तिला हलवणे जिकरीचे होते. म्हणून तोफगोळा पाहण्याचा मोह आवरला. बुरुजावरून अथांग समुद्र आणि किनारपट्टीचा नजारा अप्रतिम दिसतो. या बुरुजावरून अजून एक गोष्ट दिसली ती म्हणजे, या
तटबंदीच्या आतून सैनिकांना ये जा करण्या करीत मार्ग होता. अशी संरचना मी पहिल्यांदाच पहिली होती. तटबंदीवरुन घोडा चालवता येतो हे ठाऊक होत, पण तटबंदीच्या आतून ये जा करणे हे त्या काळातील पोर्तुगीझ अभियांत्रिकांचे कौशल्यच!
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
श्री हरेश्वर मंदिर
रेवदंडा गड भ्रमंती पूर्ण करून आम्ही श्री रामेश्वर मंदिराकडे निघालो, रेवदंडाया हुंडा रामेश्वर मंदिर २.५ किमोमीटर अंतरावर आहे. यामुळे आम्ही चालत जाण्याचा विचार केला. रामेश्वर मंदिराकडे जाते वेळी गूगल मॅप्स वर आम्हाला श्री हरेश्वर मंदिर दिसले, जवळच होते म्हणून त्या दिशेने पावला वळवली. मंदिराचा परिसर फार सुंदर आहे, मंदिराचा बाजूला पुष्करणी आहे, आणि पुष्करणी समोर लहान मुल्लाणी बनवलेली रायगडाची प्रतिकृती आहे. महादेवाचे दर्शन घेतले आणि बाजूलाच असलेल्या काळभैरव मंदिरात जाऊन काळ भैरवाचे दर्शन घेऊन आम्ही रामेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो.
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
 |
| हरेश्वर मंदिर गाभारा |
 |
| हरेश्वर मंदिर पुष्करणी |
श्री रामेश्वर मंदिर (चौल)
अवघ्या १५ मिनिटात सायंकाळी ५:१५ ला आम्ही रामेश्वर मंदिराजवळ पोहचलो. पादत्राणे कडून मंदिर अपरिसरात प्रवेश केला, पहिले गणपती मंदिर लागते (वैरागी गणेश). मंदिरात श्री गणेश आणि श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. दर्शन घेऊन आम्ही रामेश्वर मंदिराकडे निघालो. रामेश्वर मंदिर हे पारंपरिक कोंकणी पद्धतीचे लाकडी तुळे आणि कवलारू आहे. गाभार्या बाहेरील बांधलेल्या दोन घंटा मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करतात.
.jpg) |
| शिवलिंग आणि पुरातन घंट्या |
गाभार्याच्या उजव्या बाजूला श्री नारायणाचे मंदिर आहे तर डाव्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे. सभामंडपात छोट्या छोट्या शिवलिंगं पासून एक मोठे शिवलिंग तयार केले होते, याला मुख्यत्वे 'पार्थिव शिवलिंग मांडणी' असे म्हणतात. जेव्हा अनेक छोटी शिवलिंगे विशिष्ट आकारात (उदा. मोठ्या पिंडीच्या आकारात) मांडली जातात, तेव्हा त्याला 'सहस्रलिंग' पूजा असेही संबोधले जाते. रामेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर आलो.
.jpg) |
| पार्थिव शिवलिंग (सहस्रलिंग पूजा) |
मंदिराच्या सभामंडपालाच लागून विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. रामेश्वर मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजूस नवग्रह पट आहे, ते पाहून आम्ही जवळील मंदिराला लागूनच "आशापूर" मातेचे मंदिर आहे, मातेचे दर्शन घेतले आणि मंदिर परिसर न्याहाळत थोडा वेळ घालवला. मंदिर परिसरात असलेली मोठी पुष्करणी परिसराची शोभा अजून वाढवते. सायंकाळचे ५:४० वाजले होते, म्हणून आवरते घेत आम्ही "सुंदर नारायण" मंदिराकडे निघालो.
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
.jpg) |
| नवग्रह पट |
.jpg) |
| आशापुरा माता |
रामेश्वर मंदिराचा इतिहास
असे मानले जाते की चौलमध्ये पूर्वी वर्षाच्या ३६५ दिवसांनुसार ३६५ मंदिरे होती, त्यापैकी रामेश्वर हे मुख्य ग्रामदैवत आहे.
- बांधकाम व जीर्णोद्धार: या मंदिराच्या मूळ बांधकामाचा नेमका काळ माहीत नाही, परंतु ते किमान ४००-५०० वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे.
- १७४१: श्रीनिवास दीक्षित बाबा यांनी नानासाहेब पेशवे आणि मानाजी आंग्रे यांच्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला.
- १७६९: विसाजीपंत सरसुभेदारांनी दीपमाळ आणि तुळशी वृंदावन बांधले.
- १८१६: मंदिराचा नगारखाना बांधण्यात आला.
- लोककथा: एका लोककथेनुसार, हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधायला घेतले होते, परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. पुढे कान्होजी आंग्रे यांनी त्याचे काम पूर्ण केले, असेही सांगितले जाते.
स्थापत्य आणि वैशिष्ट्येमंदिराची रचना: हे मंदिर पूर्वाभिमुख असून कोकणी पद्धतीचे उतरते कौलारू छप्पर आहे. मंदिराचा गाभारा दगडी बांधकामाचा असून त्यावर ७.६२ मीटर उंच शिखर आहे.
स्वयंभू शिवलिंग: गाभाऱ्यात पितळी पत्राने मढवलेली शाळुंका आहे. या ठिकाणी इतर शिवमंदिरांप्रमाणे उंच लिंग नसून एका चौकोनी खड्ड्यात स्वयंभू शिवलिंग आहे. गाभाऱ्यात महिलांना प्रवेश निषिद्ध आहे.
तीन कुंड (अग्नी, वायू आणि पर्जन्य): मंदिराच्या सभामंडपात तीन विशेष कुंड आहेत:
- अग्नी कुंड: मध्यभागी आहे.
- वायु कुंड: गणपतीच्या मूर्तीसमोर आहे.
- पर्जन्य कुंड: नारायणाच्या मूर्तीसमोर आहे. दुष्काळ पडल्यास पाऊस पडावा म्हणून हे 'पर्जन्य कुंड' उघडण्याची प्रथा आहे (उदा. १७३१, १९४१ मध्ये हे कुंड उघडल्याच्या नोंदी आहेत). 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
.jpg) |
| पर्जन्य कुंड |
 |
| रामेश्वर मंदिर परिसर आणि पुष्करणी |
सुंदर नारायण मंदिर
रामेश्वर मंदिर परिसरातून बाहेर येत आम्ही मुख्य रस्त्यावर म्हणजे अलिबाग - रेवदंडा रोडवर आलो, तेथील तिट्यावर रिक्षावाल्यांना विचारले असता त्यांनी उजवीकडे (रेवदंडा - मुरुड च्या) दिशेने जायला सांगितले. अवघ्या ८ ते १० मिनिटात आम्ही मंदिरात पोहचलो. मंदिर रस्त्याला लागूनच पण थोडे आतमध्ये आहे, त्यामुळे सहसा लक्ष्यात येत नाही. नाम फलक नजरेस पढला म्हणून मंदिर सापडले. सध्या मंदिराचे दुरुस्तीचे काम चालू आहे. मंदिरातील श्री नारायणाची मूर्ती वेगळीच आहे,
मूर्तीवरील मुकुट पाहत्याच क्षणी इंडो-नेपाळ किव्हा इंडो-तिबेटियन शैलीतला वाटला. मूर्ती नावाप्रमाणेच फार सुंदर आणि आकर्षक आहे.
भगवान विष्णूंच्या २४ मुख्य रूपांपैकी (चतुर्विंशती केशव नामे) 'सुंदर नारायण' हे एक अतिशय मोहक आणि शांत रूप मानले जाते. विष्णूच्या मूर्तीशास्त्रानुसार (Iconography), त्यांच्या चार हातांतील शस्त्रांच्या (शंख, चक्र, गदा, पद्म) क्रमावरून मूर्तीचे नाव ठरते. मूर्तीच्या बाजूला विष्णूचे आठ अवतार दाखवले आहेत. आठ पैकी सहा अवतार कोणते ते लक्षात येते, पण दोन मुर्त्या कोणत्या अवताराच्या आहेत हे काळात नाही. कदाचित मूर्तिकाराला ते वेवस्थित कोरता आले नसावेत किव्हा आमचा अभ्यास कमी असावा.
सुंदर नारायण रूपाची सविस्तर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. सुंदर नारायण रूपातील हातांतील शस्त्रे
विष्णूच्या रूपांमध्ये शस्त्रांचा क्रम हा खालच्या उजव्या हातापासून सुरू होऊन, वरचा उजवा, वरचा डावा आणि खालचा डावा असा 'घड्याळाच्या काट्याच्या दिशेने' (Clockwise) मोजला जातो.
सुंदर नारायण रूपाचा क्रम: खालचा उजवा हात: शंख, वरचा उजवा हात: गदा, वरचा डावा हात: पद्म (कमळ), खालचा डावा हात: चक्र
२. मूर्तीची मुख्य वैशिष्ट्ये
सुंदर नारायण मूर्ती ही केवळ शस्त्रांच्या क्रमावरूनच नाही, तर तिच्या भावमुद्रेवरूनही ओळखली जाते:
सौम्य मुद्रा: नावाप्रमाणेच हे रूप अत्यंत 'सुंदर' आणि प्रसन्न असते. यात भगवंताच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यांत करुणा असते.
अलंकार: ही मूर्ती सहसा सर्व अलंकारांनी युक्त असते. डोक्यावर किरीट मुकुट, गळ्यात कौस्तुभ मणी आणि वैजयंती माला असते.
उभी मूर्ती (स्थानक): सुंदर नारायण स्वरूप सहसा उभ्या स्थितीत (स्थानक मूर्ती) दर्शवले जाते, जे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असल्याचे प्रतीक आहे.
प्रभावळ: मूर्तीच्या मागे सुंदर कोरीव काम केलेली प्रभावळ असते, ज्यामध्ये विष्णूचे इतर अवतार किंवा दशावतार कोरलेले असू शकतात.
३. विष्णूच्या रूपांमधील फरक
विष्णूच्या शस्त्रांच्या अदलाबदलीवरून एकूण २४ रूपे तयार होतात. याला 'चतुर्विंशती व्यूह' असे म्हणतात.
 |
| श्री सुंदर नारायण |
श्री नारायणाचे दर्शन घेतले आणि मुंबईला परतण्या करीत माघारी फिरून, तिट्या जवळ आलो. बराच उशीर झाला होता, सायंकाळचे ६:०० वाजले होते. अलिबाग जेट्टी हुन शेवटची बोट ७ वाजता सुटते आणि आम्हाला अलिबाग बस डेपोत पोहचायला ३० - ४० मिनिटे लागणार होती (ट्राफिक नसेल तर). म्हणून बोटने न जात बस नेच जायचे ठरले. अभिषेकाचे नातेवाईक अलिबाग मध्ये असल्या कारणाने तो अलिबाग मधेच राहणार होता. शेयर रिक्षाने अलिबाग डेपोत जाऊन पनवेलला जाणारी बस पकडायचे ठरले होते इतक्या "
मुरुड - बोरिवली" बस आली, आणि आम्ही त्या बस ने मुबईला पोहचलो.
👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा
खर्चाचा तपशील
वेळेचा तपशील